Home जागतिक फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हाट्सऍपने काढले हे नवीन फिचर!

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हाट्सऍपने काढले हे नवीन फिचर!

0

सततच्या फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या फेक लिंक्स च्या फसवणुकीला आता कंटाळून जाण्याचे काम नाही. व्हाट्सएप आपल्या प्लॅटफॉर्मवर नेहमी काम करते. त्यातच सतत फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेज साठी निर्बंध घातले आहेत. जो मेसेज जास्त वेळा फॉरवर्ड केला आहे त्यावर एकच निशाणी येते.

तसेच, व्हाट्सएप द्वारे फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या फेक लिंक्स साठी एक नवीन फिचर तयार करण्यात आलं आहे. सतत फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या लिंक्स च्या बाजूला एक सर्च टूल आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केलं की आपण गूगल सोबत जोडले जाऊ. नंतर गूगल लिंक ची तसेच त्या लिंक शी संबंधित अनेक लिंक्स ची माहीती आपल्याला देईल. जर ती लिंक व्हाट्सएप टीम ने आधीच चेक केलेली असेल तर लगेच कळून जाईल ती फेक आहे की बरोबर अशा प्रकारे हे फिचर काम करेल.

या फिचरसाठी व्हॉट्सअपने गुगलशी भागीदारी केली आहे. व्हॉट्सअपचे हे फिचर ब्राझील, इटली, आयरर्लंड, मेक्सिको, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेत लाइव्ह झाले आहे. भारतात सद्या तरी लाँचिंग ची घोषणा झाली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे. हे फिचर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही व्हर्जन वर काम करेल.