Home मनोरंजन जेम्स बाँडची भूमिका साकारणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचं निधन

जेम्स बाँडची भूमिका साकारणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचं निधन

0

जेम्स बॉंड या काल्पनिक पात्राला पडद्यावर आणणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले आहे. यांनी जेम्स बॉंडची भूमिका साकारून ती अजरामर केली व लोकांच्या मनात पडद्यावरचा जेम्स बॉंड म्हणून कायमचं स्थान मिळवलं. त्यांच्यानंतरही अनेकांनी जेम्स बॉंडची भूमिका साकारली मात्र शॉन कॉनरी हेच जेम्स बॉंडच्या पात्रासाठी प्रेक्षकांच्या मनात ठसले आहेत.

शॉन कॉनरी एक उत्कृष्ट अभिनेता होते त्यामुळे त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एक वेळा ऑस्कर, दोन वेळा बाफ्टा तर ३ वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. त्यांच्या निधनाच्या वार्तेने त्यांचा मोठा चाहतावर्ग हळहळ व्यक्त करीत आहे.