Home आरोग्य आलोक राजवाडे व पर्ण पेठे या सेलिब्रेटी कपलने केली कोरोनावर मात, आता...

आलोक राजवाडे व पर्ण पेठे या सेलिब्रेटी कपलने केली कोरोनावर मात, आता प्लाझ्मा डोनेट करणार!

0

कोरोनाच्या थैमानातून कुणीही सुटलेलं नाही. लहान, मोठे, गरीब, श्रीमंत आणि सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली. असंच एक सेलिब्रेटी कपल म्हणजे अभिनेता आलोक राजवाडे व अभिनेत्री पर्ण पेठे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोक राजवाडेला कोरोनाची लक्षणेजाणवत असल्याने त्याने कोरोनाची टेस्ट केली व तो पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. आलोक पाठोपाठ त्याची पत्नी पर्णने देखील कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता ते दोघेही ठणठणीत बरे झाले आहेत. दरम्यान काही दिवसांआधी पर्ण व आलोक दोघांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे.

लोकमतच्या रिपोर्ट नुसार कोरोनामुक्त झाल्यानंतरही पर्ण व आलोक काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहिले. “जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हाच आपल्याला त्या रोगाची तीव्रता समजते” असा अनुभव आलोकने शेअर केला आहे. पर्ण म्हणाली की, “कोरोनामुक्त झाल्यानंतर ती व आलोक दोघेही प्लाझ्मा डोनेट करणार आहेत.” शिवाय इतरांनाही कोरोना बाबतची काळजी घेण्याचा सल्ला पर्णने आपल्या चाहत्यांना दिला.