Home मनोरंजन सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतरचे फोटो लगेच डिलीट करा नाहीतर होईल मोठी कारवाई...

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतरचे फोटो लगेच डिलीट करा नाहीतर होईल मोठी कारवाई : महाराष्ट्र पोलीस

0

काल दुपारी सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या केल्याचे वृत्त ऐकून सर्वांना एकचं धक्का बसला पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या मृत शरीराचे फोटो हे सोशल मीडिया वर झपाट्याने पसरले. या फोटोंमध्ये त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला खाली उतरवून काढलेले असून त्याच्या गळ्यावरील दोरीचे निशाण सुद्धा स्पष्ट दिसतात. वेगवेगळ्या अँगल ने घेतलेले हे फोटो पोलीस तपासासाठी घेण्यात आले असून ते पुढील तपासासाठी आणि पुरावे म्हणून वापरात येणार आहेत त्यामुळे अवैध रित्या या फोटोंच्या सोशल मीडिया वर व्हायरल झाल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केले आहे.

सुशांतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

महाराष्ट्र पॉलिसीच्या सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंसंदर्भातील इशारा पोलिसांनी दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी तीन ट्विट केले आहेत. “सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. हे फोटो धक्कादायक आणि शेअर करण्यासारखे नाहीत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशाप्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जावू शकते. महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये असं आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत,” असं पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.