Home मनोरंजन केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी नेटकर्यांनि झापले

केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी नेटकर्यांनि झापले

0

केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, सोशल मीडिया वर स्वतःचा दारू पितानाचा फोटो टाकून तिने तिच्या दारू पिण्याने अर्थव्यवस्था कशी सुधरली असे जाहीर केले. नेटकर्यांना तिच्या या अशा वागण्याला तिखट शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या आधी सुद्धा तिने शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करत महाराजांचा अपमान केला होता त्यावेळी सुद्धा केतकीवर प्रचंड टीका करण्यात आली होती. नेटिझन्स तिच्या या वागण्याने तिला चांगली अद्दल घडवत आहेत, अशातच एका शिवसेना कार्यकर्त्याने तिला मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तिने सोशल मीडियावर टाकले आहे.

शिवसेना नेते हे अशिक्षित असून त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना फक्त कलाकारांना फोन करून त्रास देता येतो, अशी प्रतिक्रिया केतकीच्या सोशल मीडिया वर तिने टाकली आहे याला उत्तर म्हणून शिवसेना समर्थकांनी अतिशय तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे, “केतकीबाई स्वतःची पितळे सांभाळा , नंतर तुमची अक्कल पाजळा”. केतकी चितळे हिला सतत या ना त्या मुद्द्यावरून वाद उभा करून चर्चेत राहायची सवय लागली असून ती मराठीतली राखी सावंत असल्याच्या टीका होत आहेत.