Home मनोरंजन आलिया भट्टला उद्देशून रंगोली चंडेलचे वादग्रस्त ट्विट; आईवडिलांनी ऍक्टींग शिकवली नाही पण…...

आलिया भट्टला उद्देशून रंगोली चंडेलचे वादग्रस्त ट्विट; आईवडिलांनी ऍक्टींग शिकवली नाही पण… 

0

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बऱ्याच अनपेक्षित घटना घडल्या तसेच काही घटना वादाचे कारण बनल्या. बऱ्याच पुरस्कारांमध्ये पक्षपात केल्याचा आरोप काही अभिनेत्यांनी केला. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटाला विविध क्षेत्रांतील मिळून एकूण १३ पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील कामगिरीसाठी तसेच राझी चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टला पुरस्कार मिळाले. मात्र मीडिया न्यूजनुसार कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल यांनी याबद्दल आलिया भट्टवर ट्विट करून टीका केली. केवळ एक नाही तर एकापाठोपाठ एक असे तब्बल ५ ट्विट्स रंगोली यांनी केले.

लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार रंगोली आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, “आलियाने ‘राझी’ चित्रपटात एका मुस्लीम गुप्तहेराची भूमिका साकारली असून या चित्रपटाच्या शेवटी देशभक्ती विसरून ती मला घरी जायचंय असं म्हणून रडू लागते. ‘गली बॉय’मध्ये देखील तिने मुस्लीम तरुणीची भूमिका साकारली. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देणाऱ्यांसाठी हीच गोष्ट पुरेश होती.” तसेच पुढे बोलतांना रंगोली म्हणाल्या, “आलियाला आईवडिलांनी ऍक्टींग शिकवली नाही मात्र जिहादी राजकारणाचं पूर्ण प्रशिक्षण दिलं.”