
काल दुपारी नावाजलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी बांद्रा येथे आत्महत्या केली. पोस्टमार्टमच्या रिपोर्ट वरून सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्याने आत्महत्या करण्याच्या थोडे दिवस अगोदर पर्यंत त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही लॉकडाऊन च्या संपूर्ण कालावधीत त्याच्या घरी होती असा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुशांतने डिप्रेशन नाही तर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असल्याचे नाकारता येत नाही.
सुशांत काही महिन्यांपासून डिप्रेशनची औषधे घेत नव्हता आणि तो त्यातून पूर्ण बरा झाला होता, आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर त्याने रात्री बारा वाजता त्याची गिर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला फोन केला होता तेव्हा तिने तो उचलला नाही तसेच त्याने त्याचा मित्र महेश शेट्टीला सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने सुद्धा तो उचलला नाही.
सुशांतच्या जवळच्या मित्रानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांतनं काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांशी फोनवरून चर्चा केली होती. सुशांतनं नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याचे मान्य केले होते. सुशांत आणि रिया यांचे लग्न होणार होते, मात्र लग्नावरून या दोघांमध्ये मतभेद होते. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतच्या घरी होती, मात्र त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी शिफ्ट झाली. रिया-सुशांत यांच्या दुरावा आल्याचेही बोलले जात आहे. सुशांतनं या काळात अनेक वेळा रियाला फोन केला, मात्र तिनं फोन उचलला नाही. यामुळं सुशांत नाराज आणि रागात होता. यातून त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलीस रियाची चौकशी करणार आहेत.
मागच्या काही दिवसांपासून रिया आणि सुशांत हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता रियाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र सुशांतच्या निधनावर रियाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत रियानं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती. सुशांत आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र आहे असं रियानं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं