Home महाराष्ट्र शाळा सुरू करण्याबाबत सरकारने दिले आदेश, असे असेल वेळापत्रक

शाळा सुरू करण्याबाबत सरकारने दिले आदेश, असे असेल वेळापत्रक

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ बैठकीमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी परवानगी दिली आहे. यामध्ये १५ जून २०२० पासून शालेय शिक्षण वर्ष सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणांवर प्रत्यक्ष शाळा सूरु करण्यासाठी सुद्धा परवानगी देण्यात आली आहे.

“करोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाइन, डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावी”, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली.

कशी असेल शाळांची रूपरेखा?

रेड झोनमध्ये नसलेल्या ९ , १० १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून सुरु होणार आहेत. तर सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु होतील. तसंच तिसरी ते पाचवीर्यंतचे वर्ग सप्टेंबरपासून तर पहिली आणि दुसरीचे वर्ग व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे. ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. मात्र पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.