
सरकारी तेल विपणन कंपन्या BPCL, HPCL, Indian Oil यांनी आज शनिवारी डिझेलच्या दरात २० पैशांनी कपात केली आहे. कालदेखील डिझेलच्या दरात घट झाली होती. राजधानी दिल्ली येथे आज डिझेलचा दर ७१.८२ रुपये प्रतिलिटर इतका होता तर पेट्रोल ८१.०४ रुपये प्रति लिटर होते.
याशिवाय मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८७.८२ तर डिझेल प्रति लिटर ७८.४८ रुपये अशा किमती होत्या. तसेच आपल्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे दर कुठलीही व्यक्ती दररोज जाणून घेऊ शकते. इंडियन ऑईलचे दर जाणून घेण्यासाठी 9292992249या क्रमांकावर RSP (Dealer Code) असा मेसेज करू शकतात. तर बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP (Dealer Code) असा मेसेज आणि एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice (Dealer Code) असा मेसेज करून आपल्या शहरातील डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.