Home अर्थजगत गॅस आणि भाजीपाल्या नंतर आता पेट्रोल-डिझेलचा भडका; जनतेला नववर्षानिमित्त डोकेदुखी गिफ्ट!

गॅस आणि भाजीपाल्या नंतर आता पेट्रोल-डिझेलचा भडका; जनतेला नववर्षानिमित्त डोकेदुखी गिफ्ट!

0
petril

गॅसचे दर आभाळाला भिडले असतांना, भाजीपाला देखील सामान्यांच्या जिभेला चव देत नाहीये आणि या सर्वांमध्ये आता पेट्रोल डिझेलची देखील भर पडली आहे. न्यूज 18 लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले असून खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

पेट्रोल व डिझेलचे भाव प्रतिलीटर मागे पुढील प्रमाणे वाढले आहेत:
▪️दिल्लीमध्ये पेट्रोल – 11 पैसे
▪️कोलकाता पेट्रोल – 8 पैसे
▪️दिल्लीत डिझेल – 11 पैसे
▪️कोलकाता डिझेल – 14 पैसे

सातत्याने वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. एकीकडे ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर दुसरीकडे त्याचे पडसाद बाजारपेठेवर पडले. या सर्वांमध्ये सामान्य नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे.