Home आरोग्य “भारतात कोरोनाचा सर्वात जास्त धोका २१-३० वर्षातील तरुणांना” : आरोग्य यंत्रणा

“भारतात कोरोनाचा सर्वात जास्त धोका २१-३० वर्षातील तरुणांना” : आरोग्य यंत्रणा

0

कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा मध्यम वयोगटानंतर २१ ते ३० वयोगटाला असल्याचे दिसून येत आहे. राज्यात परवापर्यंत आढळलेल्या २०१ रुग्णांपैकी या वयोगटातील ४४ तरुणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच जवळजवळ २५% रुग्ण हे तरुण आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वात जास्त म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. वसई आणि ठाण्यात प्रत्येकी पाच तर कल्याणमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नोंदवलेल्या आकडेवारीमध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे ६१ ते ७० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे चार टक्के इतके आहे. तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये ते २ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. ८१ ते ९० वर्ष वयोगटामध्ये मृत्यूचे दर १ टक्का आहे. एक ते चाळीस वर्षे वयोगटामध्ये राज्यात एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.