Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण व सीपीआर रुग्णालयास १ कोटींचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण व सीपीआर रुग्णालयास १ कोटींचा निधी

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. जगभरात कोरोनाची दहशत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले व अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला. सकाळ च्या मीडिया न्यूजनुसार याअंतर्गत सीपीआर रुग्णालयास १ कोटींचा निधी अर्पण करण्यात आला. या निधीतून रुग्णालयास बेड्स व कपाटे देण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते बेड्स व कपाटांचे वितरण करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत २५ रुग्णवाहिकांचेही लोकार्पण करण्यात आले असे मीडिया न्यूजवरून समजले.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब व खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी एकता मंच, श्री. चैतन्य ओंकार ट्रस्ट व जाणीव ट्रस्ट यांच्यामार्फत २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले. या रुग्णवाहिका अद्ययावत असल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. तसेच या रुग्णवाहिकांमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता ऑक्सिजन सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्ट्रेचर्सचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.