Home महाराष्ट्र पुणे मंदिरे उघडी करावी म्हणून भाजपचे घंटानाद आंदोलन!

मंदिरे उघडी करावी म्हणून भाजपचे घंटानाद आंदोलन!

0

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज महाराष्ट्रातील मंदिरे आणि धर्मस्थळांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावेत, या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने आज राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते.

पुण्यामध्ये पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सारसबाग गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जागरण गोंधळ ही घालण्यात आला तसेच काही लोकांनी दार उघड उद्धवा दार उघड अशा काही घोषणा केल्या.

यावेळी मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे तसेच पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश पांडे, राजेश येनपुरे आणि त्यांच्याबरोबर शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.