Home आरोग्य कुस्तीपटू विणेश फोगटला झाला कोरोना!

कुस्तीपटू विणेश फोगटला झाला कोरोना!

0

गीता आणि बबिता अशा आपल्या बहिणींच्या पाउलावर पाऊल टाकत समोर जाणारी तसेच आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे.

अचानक तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वी विनेशनं राष्ट्रीय सराव शिबिरातून माघार घेतली होती. नुकताच तिला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट निश्चित करणारी ती भारताची एकमेव महिला कुस्तीपटू आहे.

तसेच,2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत विणेश ला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. बहिणींच्या मार्गदर्शनामुळे तिने विनेशनं कुस्तीची निवड केली.

2014 आणि 2018च्या आशियाई स्पर्धेत तिनं अनुक्रमे कांस्य व सुवर्णपदक जिंकले. तिला 2016मध्ये अर्जुन आणि 2018मध्ये पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आले.तिनं 2014 आणि 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे 48 व 50 किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकले.