Home महाराष्ट्र कॉलेजमध्ये मुलींना प्रेमविवाह न करण्याची घ्यायला लावली शपथ! पंकजा मुंडेंचा सवाल –...

कॉलेजमध्ये मुलींना प्रेमविवाह न करण्याची घ्यायला लावली शपथ! पंकजा मुंडेंचा सवाल – ‘शपथ मुलींनाच का?’

0

१४ फेब्रुवारीला जगभरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन्स डे पाश्चिमात्य संस्कृतीतून भारतात आला असून तरुण पिढीत जोमाने साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. मात्र काही अंशी ही संकल्पना भारताने तसेच महाराष्ट्राने पूर्णपणे आत्मसात केलेली नसल्याचे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे आज व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी अमरावतीतील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींना ‘प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ घ्यायला लावली. 

लोकसत्ताच्या मीडिया रिपोर्टनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदुर येथील एका महिला आणि कला महाविद्यालयात मुलींना ऐन व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी शपथ घ्यायला लावली. “मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते” अशी शपथ मुलींना कॉलेजने घ्यायला भाग पाडले.

यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. त्यात त्या म्हणाल्या, “ही शपथ मुलींनाच का? त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार ..”

पंकजा मुंडे यांचे ट्विट पुढीलप्रमाणे…