Home महाराष्ट्र साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद; पाथरीकरांनी दिले २९ पुरावे तर शिर्डी संस्थांनाचा चक्क ग्रंथच...

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद; पाथरीकरांनी दिले २९ पुरावे तर शिर्डी संस्थांनाचा चक्क ग्रंथच गायब! : आज होईल सोक्षमोक्ष?

0

शिर्डी व पाथरी येथील नागरिकांमध्ये सध्या साईबाबांच्या जन्मावरून जोरदार वाद चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी, जि. परभणीचा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. याबाबत पाथरीकारांनी ‘२९’ पुरावे असल्याचे सांगत साई बाबा यांचा जन्म पाथरीचाच असल्याचा दावा केला. परिणामी संतप्त शिर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. ‘त्यांनी आपलं विधान मागे घ्यावं’ तोवर शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शनिवारी घेतला व पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले.

लोकमतच्या एक रिपोर्ट नुसार शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पळाला. हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली. कडाडीचा बंद पाहता परिणामी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून रात्री १२ नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली. आज हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे अशी माहिती मिळत आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल व यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष होईल अशी आशा आहे. त्यामुळे दोन्ही गावच्या नागरिकांचे व सबंध महाराष्ट्राचे लक्ष या चर्चेकडे वेधले आहे. तर दुसरीकडे पाथरीच्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढत चालली आहे ज्यामुळे अनेक प्रसार माध्यमांनी येथे आज गर्दी केली असल्याचे सांगीतले जात आहे.