Home महाराष्ट्र १० वी च्या निकालाची तारीख अखेर जाहीर…

१० वी च्या निकालाची तारीख अखेर जाहीर…

0

१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी मिळाली आहे. त्याचा त्यांना आयुष्यात समोरचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. दहावीच्या निकालाची तारीख महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यंदा मंडळाकडून नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये पुणे ,मुंबई, नागपूर,कोल्हापूर, अमरावती,औरंगाबाद, नाशिक,कोकण, लातूर ही विभागे येतात अशी माहिती लोकमत मिडिया न्युज कडून देण्यात आली आहे.

दहावीचा निकाल कसा पाहू शकता?

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता, तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.