Home महाराष्ट्र फडणवीसांचा सिलेंडर बॉम्ब जयंत पाटलांनी केला फूस, फडणवीस बोलतात फेकाफेक

फडणवीसांचा सिलेंडर बॉम्ब जयंत पाटलांनी केला फूस, फडणवीस बोलतात फेकाफेक

0

कोरोना संकटामध्ये राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीनं अतिशय जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकरार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतून देण्यात आलेल्या मदतीचा संदर्भ दिला. या योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर दिले. त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपये केंद्रानं खर्च केले, असं फडणवीस यांनी सांगितलं. या रकमेला सिलिंडरच्या संख्येनं भागलं, तर एका सिलिंडरची किंमत २ हजार २२६ रुपये होते. एका सिलिंडरची किंमत इतकी आहे का? मग केंद्राकडून दिलं जाणारं अनुदान कुठे गेलं?, असे सवाल पाटील यांनी विचारले.

यावर फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मोठी मदत करण्यात आली आहे. मात्र तरीही केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच नाही अशी फेकाफेक महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या तीन मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्यावरील टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

फडणवीस पुढे म्हणाले की, सध्या लढाई कोरोनाविरुद्धची आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशी खोटी माहिती राज्य सरकारकडून दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.