Home राष्ट्रीय देशात आता फक्त ११ शहरात लॉकडाऊन?

देशात आता फक्त ११ शहरात लॉकडाऊन?

0

कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला अवघे ४ दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. पुढच्या टप्प्यात देशभरात ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली जाण्याची विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती News 18 ने दिलेली आहे.

देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख तीन शहरांचा समावेश आहे. देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता ही दाट आहे.