Home महाराष्ट्र आरामात घरी बसून काम करणार्यांना आता ऑफिसला जावेच लागणार, IT कंपन्या सुरू...

आरामात घरी बसून काम करणार्यांना आता ऑफिसला जावेच लागणार, IT कंपन्या सुरू करण्यास राज्याची परवानगी!

0

महाराष्ट्राचे IT हब असणारे पुणे कोरोना मुळे लॉकडाऊन मध्ये आहे. मार्च महिन्यापासून इथल्या सर्व IT कंपन्या ह्या टाळे लावून लोकांना वर्क फ्रॉम होम देत गाडी पुढे ढकलत आहेत. राज्य सरकारने आता मात्र IT कंपन्या परत सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाने पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी IT कंपन्या ह्या ५०% कर्मचारी संख्येवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दिलेल्या परवानगी मूळे आता IT सेक्टर पुन्हा सुरू होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.

पुणे शहर क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या आता मात्र IT कंपन्या सुरू केल्यामुळे कामावर जाणाऱ्यांची गर्दी वाढेल यात शंका नाही. या गर्दीमधून कोरोना संक्रमण कसं रोखायचे अशी जोखमीची जबाबदारी प्रशासनावर असणार आहे.

पुणे शहरात मगर पट्टा, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण इत्यादी ठिकाणी IT कंपन्यांचे महाकाय जाळे आहे.

काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.

पुण्याच्या धर्तीवर आता मुंबई मध्ये सुद्धा अश्याच प्रकारे कंपन्या सुरू करण्यास परवानगी देतात की काय असा प्रश्न मनात उपस्तिथ होतो मात्र अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हे होणे आवश्यक असल्यामुळे सरकार लवकरचं मुंबईतील उद्योग सुद्धा परत सुरू करू शकते हे नक्की!