Home महाराष्ट्र मुंबई अखेर लोकल ट्रेन्स महिलांसाठी अनलॉक! उद्यापासून सर्व महिलांना करता येणार प्रवास

अखेर लोकल ट्रेन्स महिलांसाठी अनलॉक! उद्यापासून सर्व महिलांना करता येणार प्रवास

0

मुंबईतील लोकल ट्रेन्स लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे कामाच्या जागी जाण्यास सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः महिलांना अडचणी येत होती. हे लक्षात घेऊन राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला वारंवार महिलांसाठी लोकल सेवा चालू करण्याची मागणी करत होते. ही मागणी अखेर मान्य झाली असून
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तीत करून याबद्दलची माहिती दिली.

त्यानुसार सर्व महिलांना उद्या २१ ऑक्टोबरपासून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार ही परवानगी देत असल्याचे पियुष गोयल ट्विटमध्ये म्हणाले.