Home राष्ट्रीय पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे…

पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे…

0

आज २० ऑक्टोबर २०२० ला सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला संबोधित केले. यावेळी कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक बद्दल अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी भाषणात सांगितल्या. या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

१. सणासुदीचे वातावरण असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. पण कोरोना अजून संपलेला नाही याचे भान ठेवून आपण गर्दी करणे टाळावे.
२. देशातील रिकव्हरी रेट चांगला असून दिवसेंदिवस वाढत असलेला दिसून येत आहे. तरी बेफिकीर न होता अजूनही काळजी घेण्याची गरज आहे.
३. टेस्ट्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
४. जोवर प्रभावी अशी लस येत नाही तोवर आपला कोरोनाशी लढा सुरूच राहणार आहे.
५. लस आल्यावर संपूर्ण भारतभर ती लवकरात लवकर कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
६. लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग, मास्क, स्वच्छता संबंधातील नियम पाळायला हवे.

हे सर्व ठळक मुद्दे भाषणानंतर PMO India या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले. तसेच भाषणाचा पूर्ण व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आला.