Home महाराष्ट्र मुंबई अनलॉक 1.0 चे नियम धाब्यावर, मुंबई लोकल मध्ये सामान्यांची तुफान गर्दी!

अनलॉक 1.0 चे नियम धाब्यावर, मुंबई लोकल मध्ये सामान्यांची तुफान गर्दी!

0

महाराष्ट्रात ४ वेळा लॉकडाऊन करण्यात आला मात्र तरीसुद्धा कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले नाही, आता मात्र आर्थिक स्तिथी सुधारावी म्हणून सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणत काही प्रमाणात सूट दिली आहे. रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली आहे मात्र इथे सामान्य नागरिकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात गर्दी केली असून, लोकल अगदी खच्च भरलेल्या आहेत. सरकारने वारंवार सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास बजावले आहे मात्र मुंबईकरांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

कल्याण वरून csmt साठी निघालेल्या ट्रेन मध्ये एका सीट वर एक जण असा नियम घालून देण्यात आला आहे तसेच अत्यावश्यक सेवा आणि १०% उपस्तिथी खेरीज इतरांना या लोकल मध्ये प्रवास करण्यास मज्जाव आहे पण तरीसुद्धा लोकांनी तुफान गर्दी करत नियम मोडीत काढले आहेत.

“या गाडीमध्ये काही कंत्राटदारांची माणसं आहेत तर सामान्य नागरिकही या गाडीमध्ये चढत आहेत. त्यामुळे आम्हाला बसायला जागाही मिळत नाही मग सोशल डिस्टंसिंग कसं ठेवणार? या गाडीत कोणाची तपासणीही होत नाही, कृपया प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं”, अशी मागणी काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे.