
राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासक पदे रिक्त झाली असून ती भरण्यासाठी राष्ट्रवादीने रुपये ११००० राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्यात जमा करा आणि प्रशासक बना अशी पत्रके काढल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिनांक १४ जुलै रोजी एक पत्रक त्यांच्या तालुका अध्यक्षांना पाठविले आहे यामध्ये इच्छुक उमेदवारांना रुपये ११००० बिनवापसी अटीवर राष्ट्रवादी पक्षाच्या फंडात जमा करण्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतीं आहेत आणि यामध्ये प्रशासक पदी निवड होणार असून या निवडीचे सर्व अधिकार हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या या पत्रकामुळे खळबळ उडाली असून सदर पत्रक काढणाऱ्या अध्यक्ष यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासक पद फक्त एका व्यक्तीला मिळणार असून अनेक लोकांकडून ११००० प्रमाणे पैसे उकळून त्यावर डल्ला मारण्याचा अधिकार राष्ट्रवादीला कोणी दिला असा प्रश्न विचारण्यात येणार आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धधतीने कामे चालतात हे दिसून येते.