
राज्यात कोरोनाचे एकूण १७ रुग्ण झाले असून त्यांना विलगीकरण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून त्यामध्ये एक ते दोन सोडून इतर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिकेतून आलेले आहेत. या सर्वच रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. मात्र, खबरदारी म्हणून महानगरातील काही संस्था आज पासून बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगतिले.
सरकारच्यावतीने काल मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. व्यायामशाळा,चित्रपटगृहे, नाट्येगृहे, जलतरणतलाव इत्यादींचा समावेश आहे. मात्र, हे सर्व मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरीचिंचवड आणि नागपूर या शहरांमध्येच लागू करण्यात आला आहे. तसेच, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळा बंद करण्यात येत आहेत. मात्र, तेथील परीक्षा सुरळीतपणे आणि नियमित वेळापत्रकानुसार होणार आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान मुंबई लोकलसुद्धा फिनाईलने धुवून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व लोकल गाड्या ह्या जंतुविरहीत करण्याच्या उद्देशाने विविध फिनाईलने धुवून काढणार आहेत.