Home महाराष्ट्र “अक्षय बोऱ्हाडे ने सोशल मीडिया वर टाकलेला व्हिडिओ ही नाण्याची एक बाजू...

“अक्षय बोऱ्हाडे ने सोशल मीडिया वर टाकलेला व्हिडिओ ही नाण्याची एक बाजू असू शकते”, खासदार डॉ अमोल कोल्हे

0

काल सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि जनामनात एक लाट उसळली. या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील सत्यशील शेलकर या राजकीय नेत्यावर मारहाणीचे आरोप लावले आहेत. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा अतिशय तीव्र निषेध केला आहे.

या घटनेवर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ट्विटर च्या माध्यमातून एक व्हिडिओ टाकत सांगितले की, ” मला सदर घटनेवरून असंख्य फोन कॉल आले आहेत. अक्षय जो काही सामाजिक काम करत आहे त्याबद्दल मी आदर बाळगतो. त्याने जे काही आरोप सत्यजित शेलकर याच्यावर केले आहेत तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, पण जर अन्याय झाला असेल तर कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न अजिबात उद्भवत नाही”.

यापुढे डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, ” सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी पोलीस खात्याला तसेच सदर अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हे सर्व होत असताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की अक्षय बोऱ्हाडे याने सोशल मीडिया वर जो व्हिडिओ प्रसारित केला आहे ही नाण्याची एक बाजू असू शकते, ह्या नाण्याची दुसरी बाजू ही गाव पातळी स्थानिक पातळी वरील अनेक पदर या दुसऱ्या बाजूला असू शकतात. आणि जर अशाप्रकारे सोशल मीडिया वर प्रसारित झालेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून जर आपण आपले मत बनवायला लागलो तर येणाऱ्या काळातील समाजकारणातील, राजकारणातील एखाद्याच्या कारकीर्दिला डाग/ बट्टा लावण्याचा प्रकार नाकारता येत नाही. त्यामुळे माझी सर्वाना अशी कळकळीची विनंती आहे की समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ किंवा पोस्ट वर एकाच बाजूने आपले मत बनवण्या पेक्षा आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा बघण्याचा प्रयत्न करावा. सदर प्रकरणात सत्यशील शेरकरची सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा पोलीस आणि सदर यंत्रणा यांना त्याचा सखोल तपास करू देत सत्य समोर येऊ द्या”.