
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्रासोबतच गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज २० ऑगस्ट २०२० ला पणजी येथील राजभवनात त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची नियुक्ती मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आल्यामुळे गोव्याच्या राज्यपाल पदाची जागा रिक्त होती. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाच गोव्याचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले.
कोशारी यांच्या शपथविधीला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच इतर नेते उपस्थित होते. कोशारी यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची कोकणी भाषेत शपथ घेतली.