Home राष्ट्रीय “परीक्षा दिल्यावर कोरोनामुळे माझा मृत्यू झाला तर कॉलेजमध्ये माझी समाधी बांधा!”, विद्यार्थ्याच्या...

“परीक्षा दिल्यावर कोरोनामुळे माझा मृत्यू झाला तर कॉलेजमध्ये माझी समाधी बांधा!”, विद्यार्थ्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्हायरल

0

केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी निर्माण झाली आहे, काल उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत ते देऊ शकतात, यावर विद्यार्थी संतप्त झाले असून सरकारच्या गोंधळी कारभार बघून प्रचंड चीड त्यांना येत आहे.

सोशल मीडिया वर विविध मार्गांनी व्यक्त होणारे तरुण परीक्षांच्या निर्णयाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत. एका विद्यार्थ्याने तर चक्क परीक्षा देऊन जर माझा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास माझी समाधी कॉलेजात बांधण्यात यावी अशी गजब मागणी घातली आहे. राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकार संघर्षात विद्यार्थी भरडले जात असल्यामुळे विद्यार्थी संतप्त होत विविध प्रतिक्रिया देणे अपेक्षितचं आहे. तरुणाने केलेल्या अजब मागणी प्रचंड व्हायरल झाली असून, अनेक विद्यार्थी त्याच्या मागणीचे मिम्स बनवून सोशल मीडिया वर व्हायरल करत आहेत.

काल उदय सामंत यांनी जाहीर केले कि, ” विद्यापीठ आयोगाने घेतलेल्या निर्णयात कुठल्याही राज्य सरकारला समाविष्ट करण्यात आलेले नाही. परीक्षेच्या नावावर राजकारण करत केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून परीक्षा घेणे शक्य नाही”. दरम्यान विद्यापीठ आयोगाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात याचिका जाहीर करण्यात आली असून सर्व पालक आणि विद्यार्थी हे या याचिकेच्या सूनावणीची वाट बघत आहेत.