Home महाराष्ट्र सारथी संस्थेसाठी दोन तासात आठ कोटी उभे राहणे म्हणजे मराठा समाजाची ताकद...

सारथी संस्थेसाठी दोन तासात आठ कोटी उभे राहणे म्हणजे मराठा समाजाची ताकद आहे : छत्रपती संभाजीराजे

0

मराठा समाजातील विविध कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा आर्थिक- सामाजिक – शैक्षणिक विकास करण्यासाठी SARTHI या विना नफा सरकारी कंपनीची स्थापना करण्यात आली मात्र ही संस्था निधी अभावी अडचणीत होती. ह्या संस्थेसाठी उद्याच ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल व ही संस्था कधीच बंद पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

” राज्याची परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिथे आवश्यक आहे तिथे कुठलाही विचार न करता निधी पुरवणार, सारथी संस्था कधीही बंद पडू देणार नाही हे आश्वासन करतो आणि तात्काळ उद्याच या संस्थेसाठी ८ कोटी रुपये मंजूर केले जातील ही ग्वाही देतो, आणि लवकरच समाजातील विकासासाठी vison २०२०-३० आराखडा संस्थेमार्फत तयार करण्यात येईल, ह्या १० वर्षात सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक बाबींमध्ये समाजाचा विकास करता येईल यासाठी कटीबद्धता आणण्यात येईल “, या शब्दात अजित पवार यांनी सारथी संस्थेसाठी मदत जाहीर करत असल्याचे सांगितले.

आज सारथी संस्थेसाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्यातर्फे विशेष बैठक बोलावण्यात आली होती, ह्या बैठकीला विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, छत्रपती संभाजी राजे आणि इतर मराठा समाजाच्या नेत्यांनी हजेरी लावली. बैठक संपल्या नंतर खासदार संभाजी महाराजांनी ट्विट करत २ तासात ८ कोटी रुपयांचा निधी मिळवता आला ही मराठा समाजाची ताकद असल्याचे मत मांडले.