Home राष्ट्रीय स्वस्तात iphone घ्यायचाय? जाणून घ्या ऍमेझॉनच्या ‘या’ आगामी ऑफर्स!

स्वस्तात iphone घ्यायचाय? जाणून घ्या ऍमेझॉनच्या ‘या’ आगामी ऑफर्स!

0

ऑक्टोबर महिना सुरु झाला म्हणजे भारतीयांना सण-उत्सवांचे वेध लागतात. दसरा दिवाळी आली म्हणजे सगळीकडे शॉपिंगला जोरदार सुरुवात होते. याचाच फायदा घेऊन अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्या फेस्टिव्ह सिझन मध्ये ऑफर्स काढतात. यावर्षीचा फेस्टिव्ह सिझन लवकरच सुरू होत आहे. त्यासोबतच अमेझॉनच्या भरघोस ऑफर्सही लवकरच चालू होणार आहेत.

येत्या १७ ऑक्टोबरपासून अमेझॉन फेस्टिव्ह सेल सुरू होत आहे. तर प्राईम मेम्बर्स साठी हा सेल १ दिवस आधीच म्हणजे १६ ऑक्टोबरला सुरु होईल. या सेलमध्ये जवळपास ७० हजार रुपये किंमत असलेला iphone 11 चक्क ५० हजारांच्याही कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय डेबिट/ क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास या किमतीत आणखी सूट मिळू शकते. ‘अमेझॉन द ग्रेट इंडियन सेल’ च्या टिझरमध्ये या फेस्टिव्ह सीझनमध्ये आयफोनची किंमत कमी होणार असल्याचे सांगितले आहे.