Home राष्ट्रीय नवज्योत सिंह सिद्धू फरार, निघाले अटक वारंट!

नवज्योत सिंह सिद्धू फरार, निघाले अटक वारंट!

0

माजी क्रिकेटपटू, कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू बिहार पोलिसांनी सतत नोटीस बजावून सुद्धा हजर होत नाहीत, अशा परिस्थितीत पोलिस कडक पावले उचलू शकतात. कटिहार येथून अमृतसर येथे गेलेल्या जिल्हा पोलिसांसमोर जर नवज्योत २६ जूनपर्यंत हजर झाले नाहीत आणि जर जामीन पत्रावर सही केली नाही, तर पोलिस त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंटसाठी अर्ज करू शकतात. कटिहारचे एसपी अधीक्षक विकास कुमार यांच्या माहितीनुसार तपास अधिकारी जनार्दन राम आणि जावेद आलम यांना त्याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमृतसरला पाठवण्यात आले आहे, परंतु सिद्धू यांनी नोटीस रिसिव्ह केली नाही. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी नोटीस चिकटविली आहे.

कटिहर पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी नोटीस रिसिव्ह केली नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाऊ शकते. एसपी विकास कुमार यांनी माहिती देताना म्हंटले कि, २६ जूनपर्यंत हे दोन्ही पोलिस अधिकारी तिथेच राहतील आणि नोटीस रिसीव्ह करून घेण्यासाठी प्रयत्न करतील. जर त्यांनी नोटीस घेतली नाही आणि जामिनावरील बाँडवर सही केली नाही तर तपासाच्या आधारे कोर्टाकडून अटकेसाठी खटला चालवला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, जर कोर्टाला हवे असेल तर कुर्की प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकते.

नवज्योत यांच्यावर पुढील भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे, “मुस्लिम समुदाय येथे अल्पसंख्यांक असूनही बहुसंख्य आहात. आपण एकता दर्शविली तर कोणीही आपला उमेदवार तारिक अन्वर यांना हरवू शकत नाही. भाषणादरम्यान सिद्धू म्हणाले, तुमची लोकसंख्या इथे ६४ टक्के आहे. इथले मुसलमान आमची पगडी आहे. तुम्हाला काही अडचण असेल, तर मला लक्षात ठेवा. मी पंजाबमध्येही तुमचे समर्थन करीन. विरोधकांवर निशाणा साधत सिद्धू म्हणाले, ‘हे लोक तुम्हाला विभागत आहेत. मुस्लिमांना विभागात आहे. ओवेसीसारख्या लोकांना आणत ते मतांचे विभाजन करून जिंकू इच्छित आहेत. यासह ते म्हणाले, ‘जर तुम्ही 64 टक्के एकत्र आलात तर सर्व चित्र पालटेल आणि मोदींचा पराभव होईल”