
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET परीक्षा गेल्या महिन्यात पार पडली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना निकाल कधी लागेल याची उत्सुकता लागून होती. या बाबतीत आता एक महत्वाची न्यूज समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार NEET चा निकाल येत्या आठवड्याभरातच जाहीर होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबद्दलची माहिती दिली.
हा निकाल NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजंसीच्या ntaneet. nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या आधी निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे NTA चे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत असे लोकमतच्या मीडिया न्यूजमधून समजले. आपला निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्म दिनांक, सेक्युरिटी पिन या गोष्टींची आवश्यकता असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर कॅटेगरी नुसार प्रवेशाचा कट ऑफ जाहीर होईल.