Home आरोग्य नवरात्रीमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली जाहीर

नवरात्रीमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली जाहीर

0

येत्या १७ ऑक्टोबरपासून सगळीकडे नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र यावर्षी कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याची चिन्हे आहेत. दर्शनासाठीही सोशल डिस्टंसिंगच्या अटी लागू करण्यात येतील. गणपतीच्या काळात मुंबईत सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन न झाल्याने त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाफह झालेली आढळून आली. त्यामुळे आता नावरात्रीतही असे होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने नवरात्रीसाठी नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीनुसार देवीच्या मूर्तीची उंची निश्चित करण्यात आली आहे. घरगुती मूर्ती २ फूट व सार्वजनिक मूर्ती चार फूट इतकीच ठेवावी असे महानगरपालिकेने स्पष्ट सांगितले आहे. याशिवाय नवीन मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच नवरात्रीत दरवर्षी होणाऱ्या गरबा, दांडिया अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय सार्वजनिक मंडळांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्याचे आदेश आहेत. तसेच मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण, मास्क, सोशल डिस्टंसिंग या गोष्टी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.