Home राष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष यंदा १ नोव्हेंबर पासून सुरू होणार! जाणून घ्या शैक्षणिक...

विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष यंदा १ नोव्हेंबर पासून सुरू होणार! जाणून घ्या शैक्षणिक वेळापत्रकातील इतर महत्वाचे बदल

0

UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यानुसार आता विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रवेश परीक्षा ३१ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचेही आदेश आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, २०२०-२१ वर्षीच्या पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आले आहेत. तसेच परीक्षांचा निकाल उशिरा लागला तर १८ नोव्हेंबरपासून कॉलेज सुरू केले जाऊ शकते असे UGC च्या अहवालात स्पष्ट केले आहे.

याशिवाय आणखी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय म्हणजे या शैक्षणिक वर्षातील सर्व उन्हाळ्याच्या व हिवाळ्याच्या सुट्ट्या आयोगाने रद्द केला आहेत. तरी शैक्षणिक पद्धतीत कुठलाही बदल करण्यात आला नसून विद्यापीठांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन वर्ग घेण्याची मुभा आहे.