Home राष्ट्रीय पंतप्रधान मोदींना गोळी मारण्याची आणि नॉयडाला उडवण्याची धमकी!

पंतप्रधान मोदींना गोळी मारण्याची आणि नॉयडाला उडवण्याची धमकी!

0

उत्तर प्रदेशातील नॉयडा येथे एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका तासात गोळी मारून संपवण्याची धमकी दिली. तसेच नॉयडा ला उडवण्याची धमकी दिली. त्याने हा फोन लखनऊ पोलीस स्टेशन ला केला होता त्यानंतर लखनऊ पोलिसांनी लगेचच याबद्दल नॉयडा पोलिसांना माहिती दिली.

त्या व्यक्तीच्या फोन च्या ट्रेकिंग ने त्याला लगेच पकडण्यात आले. तसेच त्या इसमाने फोन वर शिवीगाळ सुद्धा केला होता. जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा तो दारूच्या नशेत होता.

पोलिस उपायुक्त हरिष चंदर यांनी सांगितले की सोमवारी 112 नंबर वर फोन आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉयडा ला उडवण्याची धमकी दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मामूरा गावातून हरभजन सिंग नावाच्या-33 वर्षीय तरूणाला अटक केली.