Home राष्ट्रीय श्रमिक ट्रेन मध्ये मजुरांना पिण्यासाठी टॉयलेटचे पाणी! रेल्वे प्रशासनाचा अजून एक प्रताप

श्रमिक ट्रेन मध्ये मजुरांना पिण्यासाठी टॉयलेटचे पाणी! रेल्वे प्रशासनाचा अजून एक प्रताप

0

महाराष्ट्र आणि गोवा इथून निघालेल्या रेल्वेगाड्या मध्ये मजुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय केलेली नाही, नाईलाजस्तव मजुरांना टॉयलेट मधील पाणी प्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरी मुळे सदरचा किळसवाणा प्रकार मजुरांना करावा लागत आहे.

उत्तर प्रदेश मधील बलिया स्टेशन कडे जाणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांनी सांगितले की, “आमच्या कडे प्यायला स्वतः चे पाणी सुद्धा नाही, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येत आहे. टॉयलेट मधल्या नळाच्या पाण्यासाठी जोरदार भांडणे सुरू आहेत”

खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशा अडखळीच्या प्रवासामध्ये थोड्याशा आधाराची अपेक्षा असणाऱ्या मजुरांना मात्र तास अन तास रेल्वे एक ठिकानि थांबवून अजून मनस्ताप देण्यात येतो. गोव्यावरून निघालेल्या एका ट्रेन ची कहाणी तर रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्कृष्ट नमुना आहे.

उत्तर प्रदेश मधील बलिया येथे मजुरांना घेऊन निघालेली ट्रेन ही गोव्यातून निघाली मात्र नंतर तिला भुसावळ येथे जवळ जवळ अर्धा दिवस उभे ठेवण्यात आले, त्यानंतर जेव्हा ट्रेन सुरू झाली तर तिला बलिया येथे न नेता नागपूर ला नेण्यात आले. आता ही रेल्वे नागपूर वरून बलिया साठी निघाली असून त्यासाठी तिला ७२ तासांचा अधिक वेळ लागणार असल्याचे समजते. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे कसे प्रताप ऐकायला येत आहेत हे नक्की!