Home राजकीय “जर फक्त RSS कोरोना संपवत असेल तर त्यांच्या स्वतःच्या नागपुरात कोरोनाचा कहर...

“जर फक्त RSS कोरोना संपवत असेल तर त्यांच्या स्वतःच्या नागपुरात कोरोनाचा कहर का? “: राजू शेट्टी

0

धारावी मध्ये कोरोनावर मिळालेल्या नियंत्रणाचे श्रेय कोणाचे या वादात आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे त्यांच्या मते, “धारावी मध्ये कोरोना नियंत्रणाच्या यशात फक्त RSS चा वाटा आहे तर त्यांचे मुख्यालय असलेल्या नागपूर मध्ये कोरोनाचा कहर का वाढला आहे?”. RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजप यांनी शिवसेना तसेच राज्य सरकार यांना धारावी मध्ये मिळालेल्या यशात त्यांचा कुठलाही वाटा नसल्याचे सांगत आहेत.

मागच्या आठवड्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने धारावी म्हणजेच आशियातील सर्वात जास्त दाटीवाटीच्या झोपडपट्टी मध्ये कोरोना वर उल्लेखनीय नियंत्रण मिळवण्याबाबत प्रशासनाची पाठ थोपटली होती. ट्विटर आणि नंतर व्हिडिओ च्या माध्यमातून जेव्हा ही प्रशंसा समोर आली त्यानंतर याचे श्रेय कुणाचे या गोष्टीवर राज्यात राजकारण पेटले. सद्यस्थितीत राज्य सरकार त्यातल्या त्यात शिवसेना आणि भाजप तसेच RSS यांची या बाबत शाब्दिक चकमक सुरू आहे.

सामनाच्या अग्रलेखातून काल फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली त्यानंतर लगेच राजू शेट्टी यांनी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. स्वाभिमानेचे शेट्टी यांनी, ” RSS ने सबंध देशाचा कोरोना लगेच नियंत्रणात आणावा, फक्त धारावी मध्ये आणून काही फायदा नाही” अशा बोचऱ्या आणि उपहासात्मक शब्दात RSS चा समाचार घेतला आहे.