निर्भया प्रकरणात आरोपींना १ फेब्रुवारी रोजी फाशी होणार अशी माहिती मिळत आहे. या आधी २२ जानेवारी फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र पुन्हा फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ABP माझाच्या रिपोर्ट नुसार आता चारही आरोपींना आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी होणार आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, निर्भया प्रकरणातील चारही आरोपी अर्थात मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता व विनय शर्मा यांच्या विरोधात पटियाला हाऊस न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केलं असून आरोपींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली. यावर निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली त्या म्हणाल्या, “आरोपींना हवं तसंच होतं आहे. त्यांना लवकरात लवकर फाशी द्यायला हवी, मात्र आपली न्याय व्यवस्था फक्त ‘तारीख पे तारीख’ देत आहे. इथे आरोपींचा म्हणणं जास्त ऐकलं जात हे दुर्दैव आहे” त्याचबरोबर निर्भयाच्या आई म्हणाल्या “जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोवर मी शांत बसणार नाही. अद्याप मी आशा सोडली नाही व सोडणारही नाही” असा दृढनिश्चय आशा देवी यांनी व्यक्त केला. निर्भया प्रकरणातील आरोपींना तब्बल सात वर्षांनंतर फाशी देण्यात येणार आहे. ही देशातील पहिली फाशी असेल जेव्हा चार जणांना सोबत फाशी होईल.