Home राष्ट्रीय आग्रा येथील मुघल संग्रहालयाला देण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाला देण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव.

0

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात येणार. “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल” असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. मात्र या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. ताजमहाल या वास्तूच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येतं आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलले की, “उत्तर प्रदेश सरकार स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित आहे. गुलामीच्या मानसिकतेचं प्रतीक चिन्हं सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.”