Home राष्ट्रीय देशभरातील कामगार संघटनांची २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक

देशभरातील कामगार संघटनांची २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक

0

कामगार कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांबाबत कामगार वर्ग व संघटना नाखूष आहेत. सुधारणेच्या नावाखाली हा कायदा कामगारविरोधी बनवला गेला आहे असे कामगार संघटनांचे मत आहे. त्यामुळे देशातील सर्वपक्षीय कामगार संघटनांच्या कृती समितीने २६ नोव्हेंबरला बंद पुकारला आहे. या बंदमध्ये भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या शिवसेनेच्या कामगार संघटनाही सहभागी होणार असल्याचे सामनाच्या सामनाच्या मीडिया रिपोर्टवरून समजले.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ३ विधेयकांद्वारे कामगार कायद्यात सुधारणा घडवून आणल्या. सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा व कामाच्या जागी कामगाराची सुरक्षा व आरोग्य अशा या तीन विधेयकांमध्ये २९ तरतुदी करण्यात आल्या. मात्र देशातील सर्व कामगार संघटनांनी त्याला विरोध केला असून या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सामनाच्या मीडिया न्यूजनुसार या बंदची पूर्वतयारी म्हणून आनंद अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवनात महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांतील त्रुटी व त्यातून कामगारांना होणार असलेले नुकसान याबद्दल त्यांनी सांगितले व सर्व कामगार संघटनांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.