Home खेळ स्पर्धा ९९ वर बाद झालेला मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सुपर ओव्हर नंतर भावुक

९९ वर बाद झालेला मुंबई इंडियन्सचा ईशान किशन सुपर ओव्हर नंतर भावुक

0

काल २९ सप्टेंबरला आयपीएल २०२० मधील दहावा सामना पार पडला. हा सामना बँगलोर व मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळण्यात आला. अत्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बंगलोरने विजय मिळवला. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत बंगलोरच्या २०२ धावांचे लक्ष्य मुंबई पूर्ण करेल की नाही अशी शंका होती. मात्र ईशान किशन व पोलार्ड या फलंदाजांनी दमदार खेळी देऊन २०१ धावा काढल्या.

ईशान किशनने ९९ धावा केल्या व शेवटच्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. त्यानंतर पोलार्डने एक चौकार दिल्याने २०१ धावा पूर्ण झाल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घ्यावी लागली. परंतु सुपर ओव्हरमध्ये बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने शेवटच्या चेंडूत चौकार मारला व मुंबईला पराभूत केले. त्यामुळे इतकी दमदार खेळी दिलेल्या ईशान किशनच्या ९९ धावा व्यर्थ गेल्या. त्याचं शतक पूर्ण न होऊ शकल्याने तसेच संघाला विजय मिळवून न देऊ शकल्याने ईशान नाराज होऊन बसला होता. त्यावेळचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.