Home जागतिक चीनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, वूहान मधील लॉकडाउन सुद्धा...

चीनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, वूहान मधील लॉकडाउन सुद्धा हटवले

0


करोना विषाणूचा फैलाव ज्या चीनमधून जगभरात पसरला, तेथील स्थिती आता हळूहळू पूर्वरत येत असल्याचे चित्र दिसते आहे. काल चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमध्ये यावर्षी जानेवारीमध्ये करोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. तेंव्हापासून काल पहिल्यांदाच एखाद्या दिवशी एकही कोरोनाबधित मृत्यू नोंदावला गेला नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली.

गेल्या दोन महिन्यातील घडामोडींकडे बघत असताना चीनसाठी हा दिवस मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया ‘एनएचसी’ने दिली आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या हुबेई प्रांत सुद्धा कोरोना मुळे मृत्यू झालेला नाही, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

कालपर्यंत चीनच्या मुख्य भूभागावरील करोनाबाधितांची एकूण प्रकरणे ८१७४० वर पोचली आहेत. अद्याप १२४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७७,१६७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. तर ३,३३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आता चीन सरकारने सगळ्या शहरातील लॉकडाउन उठवला असून कोरोना विषाणू चे केंद्रस्थानी असलेले वूहान शहर सुद्धा लोकडाऊन मुक्त करण्यात आले, असे असले तरी लोक परत नोकऱ्यावर जाण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यास घाबरत आहेत.