
४ ऑगस्ट अर्थात मंगळवारी संध्याकाळी लेबनॉन या देशाची राजधानी असलेल्या बेरुत या शहरात भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. मीडिया न्यूज नुसार किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका जहाजात हा स्फोट झाला व शहरभर त्याचे हादरे बसले. हे जहाज फटाक्यांनी भरले असल्याने स्फोट अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. या स्फोटामुळे जहाजपासून १० किमीच्या परिघातील कित्येक मोठमोठी घरे व इमारती क्षणार्धात जमीनदोस्त झाल्या.
तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा १०० च्याही पुढे गेला आहे व तब्बल ४००० हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच तेथील संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय एका गोदामात सहा वर्षांपासून ठेवलेले २,७५० टन अमोनियम नायट्रेट देखील ब्लास्ट झाले. लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला.
भारतातील अनेक दिग्गजांनी ट्विट करत शोक व्यक्त केला.