Home आरोग्य चीनमध्ये कोरोनापेक्षाही जीवघेण्या व्हायरसचा उगम झाला, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

चीनमध्ये कोरोनापेक्षाही जीवघेण्या व्हायरसचा उगम झाला, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

0

शास्त्रज्ञांच्या एका चमूने चीन मध्ये संभाव्य जागतिक महामारीला कारण ठरू शकेल अशा एका नवीन विषाणूचा शोध घेतला असून हा विषाणू डुक्कर प्राण्यामार्फत पसरतो. शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू आता त्याचे गुणधर्म झपाट्याने बदलत आहे आणि म्हणूनच फार कमी वेळात हा जगात कोरोनापेक्षाही मोठे थैमान घालू शकेल.

शास्त्रज्ञांच्या या चमूने सरकारला डुक्कर/वराह पालन व्यवसायावर प्रचंड करडी नजर ठेवण्याचे सुचवले आहे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना योग्य ते आदेश किंवा निर्बंध देण्यात आले तर हा विषाणू रोखण्यास मदत होऊ शकते.

आधीच न भूतो बघितलेला कोरोना विषाणू आणि त्यात अजून एका विषाणूची भर यामुळे तज्ज्ञांच्या संशोधनावर प्रचंड ताण येत आहे तरी सुद्धा जगभरातील अनेक तज्ञ संस्था या विषाणूवर करडी नजर ठेवून आहेत. हा नवीन विषाणू हा चीनमधील २००९ च्या H1N1 विषाणू सारखाच असला तरी हा विषाणू त्या पेक्षाही भयानक असून नवीन रुपात तो स्वतःला बदलवून घेत आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

केम्ब्रिज विद्यापीठाच्या प्रसिद्ध वैज्ञानिकांनी सांगितले आहे की , “आपण हळू हळू अनेक विषाणू संकटांना सामोरे जाणार आहोत, कोरोना विषाणू हा त्याची सुरवात आहे, माणसांचा जनावरांशी वाढत चाललेला संबंध हा त्यांच्यातील रोग आपल्यामध्ये संक्रमित होण्याचे सर्वात मोठे कारण आहे”.