Home मनोरंजन आणखी एका स्टारची आत्महत्या? राहत्या घरी सापडला ‘या’ अभिनेत्याचा मृतदेह

आणखी एका स्टारची आत्महत्या? राहत्या घरी सापडला ‘या’ अभिनेत्याचा मृतदेह

0

गेल्या २ महिन्यांमध्ये सिनेइंडस्ट्रीतील तिसरे आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत व मराठी अभिनेता आशुतोष भाकरे या दोन आत्महत्या प्रकारणांनंतर एका टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टेलिव्हिजन वरील ‘कहाणी घर घर की’, ‘क्योकी सांस भी कभी बहू थी’ अशा प्रसिद्ध मालिकांमधून झळकलेला अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी सापडला आहे. समीर शर्माचे वय ४४ वर्ष होते. टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार समीरने देखील सुशांत सिंग व आशुतोष प्रमाणेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले.

मुंबईतील मालाड परिसरात चिंचोली बंदर भागातील नेहा बिल्डिंगमध्ये समीर शर्माचे घर आहे. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तो या घरात भाड्याने राहतो आहे. याच घरात पंख्याला टांगून गळफास घेतल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगितले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असल्याची शंका आहे. त्याच्याजवळ कुठलीही सुसाईड नोट सापडली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची मालाड पोलीस अजून चौकशी करत आहेत. समीर फोन उचलत नसल्याने त्याच्या बायकोने तेथील काही मित्रांना त्याच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.