Home मनोरंजन रक्षाबंधनाच्या दिवशी अक्षय कुमारने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईस!

रक्षाबंधनाच्या दिवशी अक्षय कुमारने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईस!

0

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ‘रक्षा बंधन’ नाव असलेल्या त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर बरोबर रक्षा बंधनाच्या दिवशीच रिलीज केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने हे पोस्टर रिलीज केले असून ५ नोव्हेंबर २०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशीही माहिती दिली.

न्यूज १८ लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या प्रेमाची गोष्ट असेल असे पोस्टरवरून समजते. या पोस्टरवरील फोटोत अक्षय कुमार ४ बहिणींसोबत आहे. तसेच ‘सिर्फ बहने देती हैं 100% रिटर्न’ अशी टॅगलाईन देखील आहे. अक्षय कुमारची बहीण अलका या चित्रपटाची निर्माती असून आनंद राय हे दिग्दर्शक आहेत. तसेच चित्रपटाची कथा हिमांशी राय यांनी लिहिली आहे.