Home राष्ट्रीय अचानक पाकिस्तानी न्युज चॅनेल वर झळकला भारताचा झेंडा…

अचानक पाकिस्तानी न्युज चॅनेल वर झळकला भारताचा झेंडा…

0

सद्यस्थितीत भारतीय अँप्स हॅक होत असताना अचानकच ही न्युज समोर आली आहे. पाकिस्तान चे प्रसिध्द आणि आघाडीचे मीडिया हाऊस असलेल्या डॉन न्यूजची वृत्तवाहिनी अचानक हॅक झाल्याचे समजत आहे.

रविवारी दुपारी अचानक वृत्तवाहिनी सुरू असताना प्रसारण बंद पडून त्यावर भारताचा झेंडा दिसल्याने आढळून आले आहे तसेच तिथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ही लिहिलेल्या होत्या हे नक्की किती वेळ दाखवण्यात आल हे माहीत नाही पण यापूर्वी ही भारताने अशा सिस्टीम हॅक केल्या आहेत असा आरोप डॉन न्युज चॅनेल ने केला आहे.

या संपूर्ण घटनेचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. जेव्हा ही घटना घडली त्यानंतर थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आणल्या गेली आणि चॅनेल पूर्ववत सुरू झाले. तरीही या घटनेचा कसून तपास करणे सुरू आहे . अशी माहिती न्युज जॉकी ने ट्वीट मार्फत दिली आहे.