Home मनोरंजन दीपिकाचा आगामी चित्रपट ‘छपाक’ वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयात चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी

दीपिकाचा आगामी चित्रपट ‘छपाक’ वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयात चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी

0

ऍसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट उद्या १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोन लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारतांना दिसणार आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट काही मुद्द्यांवरून वादात अडकला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी याचिका कोर्टात दाखल केली गेली आहे अशी माहिती मीडिया न्यूजवरून मिळाली. तसेच ट्विटरवरही लोक या चित्रपटाबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी अग्रवाल यांची वकील अपर्णा भट्ट यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. याचे कारण म्हणजे बऱ्याच वर्षांपासून लक्ष्मीची वकील असून त्यांना चित्रपटात क्रेडिट दिलं गेलं नाही असा आरोप अपर्णा भट्ट यांनी केला. या बातमीमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

याशिवाय आणखी एका कारणामुळे हा चित्रपट व दीपिका पादुकोन चर्चेत आहेत. हे कारण म्हणजे चित्रपटातील खलनायकाचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका मासिकात या ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव नदीम खान असे नमूद करण्यात आले आहे परंतु चित्रपटात ‘राजेश’ हे नाव वापरले गेले आहे. यावरून आरोपीचा धर्म बदलला व हे जाणूनबुजून केलं असा आरोप राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो यांनी केला. यावरून नेटकाऱ्यांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ट्विटरवर #boycottchhapaak हे हॅशटॅग वापरून लोक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करीत आहेत.