
हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, मात्र हे अगदी खरं आहे. ऑस्ट्रेलियात सध्या दुष्काळ आहे. यंदा तिथे अतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात तिथे 40 ते 45 degree Celsius तापमानाची नोंद झाली. परिणामी उन्हाळा आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने काळजावर दगड ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, ऑस्ट्रेलियात दुष्काळ असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. या भागातील उंट लोकवस्तीत येऊन पाण्यासाठी धुडगूस घालतात. संधी मिळेल तेव्हा लोकांचं साठवलेलं पाणी पिऊन टाकतात. परिणामी स्थानिक प्रशासनाने उंट खूप पाणी पितात म्हणून 10,000 उंटांना गोळ्या घालण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. न्यूज 18 लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार ऑस्ट्रेलियात पुढचे पाच दिवस उंटांना मारण्याचे काम चालेल. यासाठी एक विशेष टीम निवडली असून हेलिकॉप्टरच्या मदतीने पुढील पाच दिवसांत दहा हजार उंटांना शोधून मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.