Home अर्थजगत हे ११ अ‍ॅप डाऊनलोड करू नका अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे…

हे ११ अ‍ॅप डाऊनलोड करू नका अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे…

0

आजकाल ऑनलाईन गंडे घालणाऱ्या भुरट्यांचं प्रमाण फारच वाढलं आहे. आधुनिकीकरण आणि स्मार्टफोनचा जास्तीत जास्त होणारा वापर पाहता युजर्सनी काळजी बाळगायला हवी. अन्यथा एखादी छोटी चूक खूपच महागात पडू शकते. बऱ्याचदा आपण मोबाइलमध्ये कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करतो. त्या अ‍ॅपची कुठलीही मागची पुढची माहिती न घेता. मात्र ही चूक तुमच्या खात्यातील सगळे पैसे रिकामे करू शकते. लोकमतच्या एका रिपोर्टनुसार पंजाब नॅशनल बँकेने यासंदर्भात ग्राहकांना खबरदारीचा इशारा दिला. त्याचबरोबर आपल्या फोनमध्ये कुठले अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नये याचाही सल्ला दिला.

या फ्रॉड व धोकादायक अ‍ॅप्सची नावे पुढील प्रमाणे :
Quicksupport
Anydesk
VNC
UltraVNC
TeamViver
Ammyy
Seescreen
BeAnywhere
LogMein
RealVNC
Skyfexetc

हे सर्व अ‍ॅप्स केवळ पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठीच नाही तर सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी धोकादायक आहेत. PNB ने ग्राहकांच्या जागरूकतेसाठी पीएनबी का फंडा नावाने एक अभियान चालू केलं असून यात ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले जात आहेत. या अभियानात फसवणाऱ्या अ‍ॅप्स व्यतिरिक्त टेक्स मॅसेज, व्हाट्सअ‍ॅप, आणि ईमेलवरून होणाऱ्या फसवणुकी बद्दलही माहिती देण्यात आली. कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नका किंवा कुठलंही थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करू नका. अन्यतः ही चूक फार महागात पडू शकते असा बँकेकडून इशारा देण्यात आला आहे.